

Caught red-handed taking Rs 5 lakh bribe at Lucknow office
Sakal
देशभरात आर्थिक गैरव्यवहारांचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांवरच आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. एका प्रकरणात कारवाईचा धाक दाखवून आणि त्यातून सही सलामत बाहेर काढण्याचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या ईडीच्या दोन अधिकाऱ्यांना सीबीआयच्या पथकाने लखनौमध्ये सापळा रचून रंगेहाथ पकडले. केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाच लाचखोरीच्या प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.