
राज्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. अभिनेत्री रन्या रावचा फ्लॅट, व्यापारी तरुण राज याचे घर, आरटी नगरमधील एका ज्योतिषाचे कार्यालय, पोलिस अधिकारी आणि कस्टम अधिकाऱ्यांच्या घरांचा समावेश आहे.
बंगळूर : दुबईहून बेकायदेशीर सोने तस्करी प्रकरणी (Gold Smuggling Case) अभिनेत्री रन्या राव (Actress Ranya Rao) हिच्या आलिशान फ्लॅटसह तिच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापे टाकले. गुरुवारी शहरातील विविध भागांत छापे टाकले.