ED Raids: अंदमान निकोबारमध्ये ईडीचा पहिलाच छापा; सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण उघड
Andaman Bank Scam: अंदमान निकोबारमध्ये पहिल्यांदाच ईडीचे छापे पडले असून सहकार बँकेतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. ही कारवाई काँग्रेसचे माजी खासदार कुलदीप राय शर्मा यांच्याशी संबंधित आहे.
पोर्ट ब्लेअर : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)वतीने अंदमान निकोबार येथे गुरुवारी पहिल्यांदाच छापे घालण्यात आले. सहकार बँकांतील कर्जाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.