
बेंगळुरूः काँग्रेसचे बळ्ळारीचे खासदार ई. तुकाराम आणि पक्षाचे तीन आमदार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापे टाकले. ही कारवाई तथाकथित वाल्मीकी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग होती, असे सांगण्यात आले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत बळ्ळारी येथील पाच आणि बंगळुरूतील तीन आस्थापनांवर ईडीने छापे टाकले. या छाप्यांमध्ये खासदार तुकाराम; तसेच आमदार नारा भरत रेड्डी (बळ्ळारी शहर), जे. एन. गणेश (कंपळी) आणि एन. टी. श्रीनिवास (कुडलगी) यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.