ED Raids in Chhattisgarh: मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर ED चे छापे; भुपेश बघेल यांनी PM मोदी-शाहांचे मानले आभार!

bhupesh baghel modi
bhupesh baghel modiesakal

ED raids in Jharkhand Chhattisgarh

जयपूर- छत्तीसगडमध्ये केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाची छापेमारी सुरु आहे. बुधवारी ईडीने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे. विनोद वर्माच्या देवेंद्रनगर येथील घरावर आणि ओएसडी मनीष बंछोर, ओएसडी आशीष वर्मा आणि त्यांच्या जवळचे व्यावसायिक विजय भाटिया यांच्या घरी ईडी छापेमारी करत आहे. मुख्यमंत्री बघेल यांनी याला बर्थडे गिफ्ट म्हणत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मार्मिक टिप्पणी करत धन्यवाद म्हटलंय.

छत्तीसगडमध्ये कथित मद्य आणि कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडी छापेमारी करत आहे. याप्रकरणी ईडीने दहापेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे. कोळसा परिवहन घोटाळ्यामध्ये सीएम सचिवालयाचे अधिकारी सौम्या चौरसिया आणि रायगड जिल्हाधिकारी रानू साहू यांच्यासह अनेक अधिकारी आणि व्यायसायिकांना ईडीने अटक केली आहे. बुधवारी झालेली छापेमारी कशासंबंधात आहे हे स्पष्ट झालेलं नाही.

bhupesh baghel modi
Sakal Podcast : चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार ते कांद्याचा दर शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार का?

भुपेश बघेल यांचा आज जन्मदिवस आहे. आजच त्यांचे राजकीय सल्लागार आणि ओएसडी यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. याआधी ईडीने २१ जुलै रोजी रानू साहू, त्यांचे आयपीएस पती यांच्या घरासह काँग्रेस नेता आणि अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली होती. २२ जुलै रोजी ईडीने रानू साहू यांना अटक केली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायाधीशांच्या कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने १४ दिवसांसाठी त्यांचा ताबा मागिलता होता.

bhupesh baghel modi
Dr Bharti Pawar : केंद्र सरकार 2 लाख टन कांदा खरेदी करणार : डॉ. पवार

बघेल काय म्हणाले?

छत्तीसगडमध्ये झालेल्या छापेमारीसंदर्भात मुख्यमंत्री बघेल यांनी एक्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जन्मदिवसादिवशी झालेली छापेमारी त्यांनी त्यांच्यासाठी गिफ्ट असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद म्हटलं.

बघेल म्हणाले, 'आदरणीय पंतप्रधान मोदी जी आणि अमित शाह जी. माझ्या वाढदिवसादिवशी माझे राजकीय सल्लागार आणि माझे ओएसडी यांच्यासह जवळच्या लोकांवर छापेमारी करुन तुम्ही अमूल्य भेट दिली आहे. यासाठी तुमचे आभार.' (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com