राबर्ट वद्रांशी संबंधित तिघांवर 'ईडी'चे छापे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातल्याने कॉंग्रेसचा तिळपापड झाला आहे. निव्वळ सूड भावनेतून छापे घालण्यात आले असून, विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या पराभवावरील लक्ष अन्यत्र वळविण्याचा हा डाव असल्याचा आरोप संतप्त कॉंग्रेसने केला आहे. 

संरक्षण साहित्य खरेदी व्यवहारात कथितपणे कमिशनवाटपाची चौकशी करण्यासाठी "ईडी'ने रॉबर्ट वद्रा यांच्या कंपनीतील तीन जणांवर छापे घातल्याची बाब समोर आल्यानंतर कॉंग्रेसमधून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटली. वद्रा यांना पाठिंबा देताना कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला.

"मोदी सरकार आता स्मशानात पोहोचले असताना निरंकुश बादशहाने नियम, कायदा, घटना सर्व धाब्यावर बसवले आहे. पाच राज्यांमध्ये पराभव स्पष्टपणे दिसत असल्यामुळे पंतप्रधान मोदी जुन्या क्‍लृप्त्या वापरत आहेत. वद्रांवर सुडाच्या भावनेतून छापे टाकण्याचा आणि पराभवावरून अन्यत्र लक्ष वळविण्याचा हा प्रयत्न आहे. सीबीआय, इन्कम टॅक्‍स, ईडी या तपास यंत्रणा मोदींच्या राजकीय दलाल म्हणून काम करत असून, त्यांना नियमांची कदर नाही. मोदी आता डॉनच्या भूमिकेत आहेत. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा जपण्याऐवजी ते आता राजकीय विरोधकांचा बदला घेत आहेत,' अशा शेलक्‍या शब्दांत सुरजेवाला यांनी टीकास्त्र सोडले. 

प्रत्येकाला पंधरा लाख रुपये, दोन कोटी रोजगार कधी मिळतील, 40 रुपये लिटर पेट्रोल, डिझेल कसे मिळेल, सिलिंडर 1000 रुपयांऐवजी 350 रुपयांना कधी मिळेल, या जनतेच्या प्रश्‍नांमुळे मोदींच्या पायाखालची वाळू निसटत चालली असून, अशा छाप्यांमधून बेलगाम बदनाम बादशहाचे बिथरलेपण समोर आले आहे, असाही टोला कॉंग्रेस प्रवक्‍त्याने लगावला. 

Web Title: ED raids on three related to Robert Vadra