Arpita Mukherjee : ईडीची उडाली झोप! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातही घबाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arpita Mukherjee

ईडीची उडाली झोप! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातही सापडलं घबाड

कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. याप्रकरणातील आरोपी पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी हीच्या दुसऱ्या घरावर ईडीनं बुधवारी धाड टाकली. यामध्ये तिच्या घरातून तब्बल २८.९० कोटी रुपयांची रोकड आणि पाच किलो सोनं आढळून आलं. तसेच काही महत्वाची कागदपत्रेही ईडीच्या हाती आली आहेत. यापूर्वी अर्पिता मुखर्जीच्या पहिल्या फ्लॅटमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी २१ कोटी रुपये जप्त केले होते. (ED recovers Rs 29 crore cash over 5 kg gold from Arpita Mukherjee second flat)

अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातून जप्त केलेली रोकड इतकी मोठी होती की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याची मोजदाद करण्यासाठी तब्बल १० तास लागले. ही मोठी रक्कम तिच्या फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवण्यात आली होती. विशेष म्हणजे ही रक्कम आणि इतर वस्तू नेण्यासाठी ईडीला चक्क मोठा ट्रक मागवावा लागला. दरम्यान, गेल्या आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी अर्पिता मुखर्जीच्या घरातून २१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. ही जप्त रक्कम शिक्षक भरती घोटाळ्यातील गुन्ह्याच्या कामांसाठी वापरल्याचा ईडीला संशय आहे.

अर्पिताच्या घरातून केव्हा काय जप्त?

अर्पिता मुखर्जीच्या घरावरील पहिल्या छाप्यात ईडीनं २१.९० कोटी रुपयांची रोख रक्कम तसेच ५६ लाखांचं परदेशी चलन आणि ७६ लाखांचं सोनं असं एकूण २३.२२ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला होता. त्यानंतर बुधवारी तपास एजन्सीनं २० कोटी रुपयांची रोख रक्कम आणि २ कोटी रुपयांची सोन्याची बिस्कीटं जप्त केली. या रक्कमेची ईडीचे अधिकारी अद्यापही मोजदाद करत आहेत. दोन्ही छाप्यांमध्ये मिळून अर्पिता मुखर्जीच्या घरांमधून ४५.२२ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अर्पिता मुखर्जीचं म्हणणं काय?

घरात मिळालेल्या घबाडाबाबत स्पष्टीकरण देताना अर्पिता मुखर्जीनं ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, माझ्या काही कंपन्यांसंदर्भातील ही संपत्ती आहे. चौकशीदरम्यान, अर्पितानं कबूली दिली की, एक-दोन ती आपल्या घरातून रोख रक्कम इतरत्र हलवणार होती पण ईडीच्या छाप्यांमुळे तिची ही योजना फसली.

Web Title: Ed Recovers Rs 29 Crore Cash Over 5 Kg Gold From Arpita Mukherjee Second Flat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :West BengalDesh newsED