Mahua Moitra : महुआ मोइत्रांच्या अडचणीत वाढणार! खासदारकी गमावल्यानंतर EDने पाठवलं समन्स; 'त्या' प्रकरणाची होणार चौकशी

पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात खासदारकी गमावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
ED summons TMC leader Mahua Moitr  case cash query foreign exchange violation case
ED summons TMC leader Mahua Moitr case cash query foreign exchange violation case

ED summons TMC leader Mahua Moitra : पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात खासदारकी गमावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महुआ यांना १९ फेब्रुवारीला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. परकीय चलन उल्लंघन प्रकरणी ईडीने महुआ यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

गेल्या वर्षी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोइत्रा यांच्यावर महागड्या भेटवस्तू आणि पैशांच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टारगेट करण्यासाठी महुआ मोइत्रा लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेशी छेडछाड केल्याचा ही आरोप करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण एथिक्स कमिटीकडे पाठवण्यात आले, जिथे महुआ मोइत्रा या दोषी आढळल्या. यानंतर त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

महुआ यांना समन्स बजावल्याबाबत एका ईडीच्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, सक्तवसुली संचालनालयाने फेमा उल्लंघन केल्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांना १९ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. संसदेच्या एथिक्स कमिटीने दोषी ठरवलेल्या महुआ यांनी कोणताही गैरप्रकार केल्याचे आरोप फेटाळले असून अदानी समूहाच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा दावा केला आहे.

ED summons TMC leader Mahua Moitr  case cash query foreign exchange violation case
Electoral Bonds SC Verdict : इलेक्टोरल बॉन्ड तर नाहीत...मग राजकीय पक्षांना पैसे कसे मिळणार? आता 'हे' आहेत पर्याय

मोइत्रा यांनी नोव्हेंबरमध्ये 'एक्स'वर पोस्ट करत लिहिले होते की, लोकपालने लोकपाल कायद्यांतर्गत या प्रकरणाशी संबंधित कोणताही आदेश वेबसाइटवर अपलोड केलेला नाही किंवा सीबीआयने अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही. नेहमीच्या मीडिया सर्कसप्रमाणे सूत्रांकडून पत्रकारांना माहिती दिली जात आहे. मला टार्गेट करण्यापूर्वी १३ हजार कोटींचा अदानी कोळसा घोटाळा सीबीआयच्या प्राथमिक चौकशीचा विषय बनेल, अशी आशा आहे.

त्याचवेळी महुआ मोइत्रा यांनी पैसे घेऊन सभागृहात प्रश्न विचारल्याच्या आरोपांबाबत सीबीआयच्या प्रश्नावलीला उत्तर पाठवले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआय त्यांची उत्तरे तपासत आहे आणि त्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंधक लोकपालाकडे एक अहवाल पाठवतील. लोकपालांच्या सूचनेनुसार एजन्सी मोइत्रा यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करत आहे.

ED summons TMC leader Mahua Moitr  case cash query foreign exchange violation case
NCP MLA disqualification Verdict: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केले शिक्कामोर्तब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com