

EduLeaders Promotes Digital Learning in Uttar Pradesh
esakal
उत्तर प्रदेशातील प्राथमिक शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आणि तंत्रज्ञानस्नेही करण्यासाठी शिक्षकांनी सुरू केलेल्या ‘एडुलीडर्स’ या स्वयंसेवी चळवळीची चर्चा होत आहे. कोरोना काळात अवघ्या १०० शिक्षकांना सोबत घेऊन सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून आज राज्यातील सुमारे २० लाख विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या चळवळीचे संस्थापक आणि बस्ती येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. सर्वेश मिश्र यांनी शिक्षकांना डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासाठी एकत्र आणले. या उपक्रमांतर्गत राज्यभरातील ४५ हजार शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.