राज्यात स्वबळावर सत्तेसाठी तयार राहा -  जे. पी.  नड्डा 

j p nadda
j p nadda
Updated on

नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपची स्वबळावर सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. कोरोनाच्या निर्मूलनात राज्यातील सरकारला आलेले अपयश जनतेपुढे प्रभावीपणे मांडा, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज सांगितले. ‘‘सरकार पाडण्यात आम्हाला अजिबात रस नाही. आधी ते चालवून दाखवा,’ असे आव्हान देतानाच हे सरकार त्याच्याच अंतर्विरोधाने लवकरच पडेल,’ असे भाकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीला नड्डा यांनी दिल्लीतून संबोधित केले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश ऊर्फ सतीश वेलणकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रभारी सरोज पांडे आदी नेते सहभागी झाले होते. नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना यापुढे राज्यात यापुढे शत-प्रतिशत भाजप हेच ध्येय ठेवण्याची सूचना केली. ते म्हणाले की कोरोना परिस्थिती हाताळण्यातील राज्य सरकारचे अपयश जनतेसमोर मांडतानाच भाजप कार्यकर्त्यांनी राज्यातील सामान्य माणसाचे प्रश्‍न सक्रियपणे सोडवले पाहिजेत. मात्र निर्धार हवा तो भाजपची स्वबळावर सत्ता आणण्याचाच. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उद्धव ठाकरे सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले, ‘आमचे सरकार पाडून दाखवा, असे वारंवार सांगितले जाते. पण भाजपला हे सरकार पाडण्यात रस नाही. सरकार पाडणे सोडा, आधी ते चालवून तर दाखवा. हे सरकारच अंतर्विरोधांनी भरलेले आहे व त्यातूनच ते पडेल. एकमेकांच्या तंगड्या तोडण्यास तुम्हीच सज्ज व्हाल व रोज तुमचे तेच सुरू असते. आम्ही त्यानंतर महाराष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य कसे असेल हे नक्की ठरवू. 

रिक्षात चालकाचे नव्हे, प्रवाशांचे चालते ! 
सरकार तीन चाकी असले तरी त्याचे स्टिअरिंग आपल्याच हाती असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले होते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ रिक्षाचे स्टेअरिंग उद्धवजींच्या हाती आहे. पण ते एक गोष्ट विसरतात की कोठे जायचे हे रिक्षाचालक नव्हे तर प्रवासी ठरवत असतात. प्रवाशांनी सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा नेली नाही तर चालकाचा रोजगार बुडतो. मात्र या रिक्षात बसलेल्यांचेही काही समजत नाही. एक म्हणतो, उत्तरेकडे न्या, तर दुसरा दक्षिणेकडे चला, असे म्हणतो. मध्येच कोणी ब्रेक मारते, कोणी हॉर्न वाजवते. त्यामुळे या रिक्षाची परिस्थिती कोण, कोठे आणि कशासाठी घेऊन चाललेय ते कळत नाही.’’ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com