दांडीबहाद्दर ६० पोलिस कर्मचारी निलंबित

गृहमंत्रालयाकडून चौकशीचे आदेश; ईदच्या दिवशी गैरहजर
Eid in Delhi Absent on day of Eid 60 police personnel suspended
Eid in Delhi Absent on day of Eid 60 police personnel suspendedSakal

नवी दिल्ली : दिल्लीत ईदच्या दिवशी संवेदनशील भागांत ड्यूटी लावलेली असूनही दांडी मारणाऱ्या ६० पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचेही निर्देश गृह मंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंतच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या तुकडीतील (थर्ड बटालियन) बहुतांश कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. ईद व अक्षय्य तृतीया तसेच परशुराम जयंती एकाच दिवशी येणे यामुळे यंदा राष्ट्रीय राजधानीत मंगळवारी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दिल्ली पोलिसांची मोटारसायकल पथके व अन्य अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या आठही जिल्ह्यांच्या परिसरांत चोख बंदोबस्त ठेवला होता. विविध मशिदीच्या इमामांशी अधिकाऱ्यांनी चर्चा करून त्यांना लाउडस्पीकरच्या आवाजाच्या मर्यादेबाबत न्यायालयीन आदेशाची माहिती दिली होती. काल केवळ थर्ड बटालियनचे किमान ५०० जवान ड्यूटीवर होते.

या सर्वांच्या सुट्या व रजा रद्द करून त्यांना कामावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले होते. यातील निलंबित कर्मचाऱ्यांची ड्यूटी ईदच्या दिवशी पहाटे चारपासून सदर बाजारातील ईदगाह चौकाच्या परिसरात लावण्यात आली होती. सकाळी ९ नंतर त्यांनी ईदगाह परिसरात गस्त घालावी, असेही निर्देश होते. मात्र या परिसरातील ६० जवान कोणालाही सूचना न देता घरी निघून गेल्याचे आढळले. त्यांचा शोध घेतल्यावर त्यातील १५ जणांनी सकाळी परतले व त्यांनी काम सुरू केले. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com