Eknath Shinde : दीक्षाभूमीवर आल्यावर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते
Deputy Chief Minister Maharashtra : दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करत प्रेरणा व समाधान मिळाल्याचे सांगितले.
नागपूर : ‘‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करून प्रेरणा व नवी ऊर्जा मिळते. दीक्षाभूमीला आल्यानंतर नेहमीच वेगळी अनुभूती व समाधानही मिळते,’’ अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे व्यक्त केल्या.