
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीला चार-पाच महिन्यांचा कालावधी राहिला असताना. मतदार याद्यांच्या फेरतपासणीदरम्यान घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची सत्यता तपासण्याचा विचार निवडणूक आयोग करीत आहे. मतदारयाद्यांत नावांचा समावेश तसेच नावे कमी करण्यात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष आणि काही सामाजिक संघटनांकडून वारंवार होत असल्यामुळे आयोगाकडून वरील पाऊल उचलले जाणार असल्याचे समजते.