esakal | राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

rajya sabha

राज्यसभेच्या ६ जागांवर पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ४ ऑक्टोबरला मतदान घेतले जाणार असून निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती गुरुवारी दिली.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने पाच राज्यात रिक्त झालेल्या राज्यसभेच्या ६ जागांवर पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ४ ऑक्टोबरला मतदान घेतले जाणार असून निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती गुरुवारी दिली. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील राज्यसभेच्या जागांचा यामध्ये समावेश आहे. पोटनिवडणुकीची अधिसुचना १५ सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय इतर पाच जागा या तिथल्या खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाल्या होत्या. यात थावरचंद गहलोत, मध्य प्रदेश, मानस भूनिया, प बंगाल, विश्वजीत दायमरी, आसाम, थिरू मनुस्वामी आणि थिरू वैथिलिंगम, तमिळनाडू यांनी राजीनामा दिल्यामुळे निवडणूक होणार आहे.

हेही वाचा: नॅशनल हायवेवर पहिल्यांदाच उतरवले सुखोई; गडकरी, राजनाथ सिंह साक्षीदार

राज्यसभेच्या पोटनिवणडणुकीसाठी ४ ॲाक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. १५ सप्टेंबरला याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार असून २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्ज मागे घेण्याची मुदत २७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

loading image
go to top