esakal | "निवडणूक आधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा नोंदवला पाहिजे"

बोलून बातमी शोधा

nashik court

"निवडणूक आधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा नोंदवला पाहिजे"

sakal_logo
By
नामदेव कुंभार

भारतामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसागणिक अधिकच वेगानं वाढत आहे. पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यातच महिनाभरापासून देशातील पाच राज्यात निवडणूक प्रचार जोरानं सुरु होता. यामध्ये तुंबड गर्दी पाहायला मिळाली होती. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसत नव्हते. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कोरोना महामारीतून सावरत असताना प्रचारसभा घेण्यासाठी राजकीय पक्षांना परवानगी दिल्याप्रकरणी मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं आहे. येथील मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी एका सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाला फटकारलं. ते म्हणाले की, 'देशात आलेल्या कोरोना महारीच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगातील आधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा नोंदवला पाहिजे.'

न्यायालयीन कामकाजाची माहिती देणाऱ्या 'लाइव लॉ'नं दिलेल्या माहितीनुसार, मद्रास हाय कोर्टातील मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी भारतीय निवडणूक आयोगाला फटकारलं. ते म्हणाले की, ' तुमची संस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार आहे.' दोन मे रोजी होणाऱ्या मतमोजणी संदर्भात मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगाला चेतावणी दिली आहे. मतमोजणीवेळी आणि त्यानंतर कोरोना महामारीच्या सर्व नियमांचं पालन होईल की नाही, हे सुनिश्चित करावं. त्यासाठी योग्य ती उपायोजना करण्यात यावी. जर निवडणूक आयोगानं उपाययोजना केली नाहीतर मतमोजणी तात्काळ स्थगित केली जाईल, असं मद्रास हायकोर्टानं सांगितलं आहे. 30 एप्रिलपर्यंत उपाययोजना न्यायालयासमोर सादर करा, असा आदेशही यावेळी मद्रास हायक्रोर्टानं निवडणूक आयोगाला दिला.

लोकांचं आरोग्य सर्वात महत्वाचं आहे आणि संविधानिक अधिकाऱ्यांना याची जाणीव करुन द्यावी लागते, हे सर्वात चिंताजनक आहे. जर एखादा व्यक्ती जिवंत राहिला तरच लोकशाहीच्या आधिकाराचा लाभ घेईल, असं मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं. निवडणूक रॅली आयोजित करण्यात आल्या तेव्हा तुम्ही दुसऱ्या गृहावर होतात का? असे म्हणत मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं.