Electoral Bonds Update: EC कडून इलेक्टोरल बाँड्सचा पक्षनिहाय डेटा जारी! भाजपला मिळाले सर्वाधिक पैसै तर दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवर कोण?

Electoral Bonds Update: निवडणूक रोख्यांची पक्षनिहाय संख्या निवडणूक आयोगाने आज (रविवार) जाहीर केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच पेटलं आहे.
Electoral Bonds Update
Electoral Bonds Updateesakal

Electoral Bonds Update:

निवडणूक रोख्यांची पक्षनिहाय संख्या निवडणूक आयोगाने आज (रविवार) जाहीर केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच पेटलं आहे. या यादीत भाजपने निवडणूक रोखे वटवत 6 हजार 986 कोटींची  कमाई केली आहे. तर 2019-20 या काळामध्ये तब्बल 2 हजार 555 कोटींची कमाई भाजपने केली आहे, असं डाटामध्ये स्पष्ट झालं आहे.

रोखे वटवत कमाई करण्यामध्ये भाजप एक नंबर तर तृणमूल काँग्रेसचा दुसरा क्रमांक लागतो. काँग्रेस तिसऱ्या नंबरवर आहे. काँग्रेसने 1335 कोटींची कमाई केली आहे.

  1. भाजपने एकूण 6 हजार 986.5 कोटी

  2. तृणमूल काँग्रेस 1397 कोटी रुपये

  3. काँग्रेसने एकूण  1,334.35 कोटी

  4. डीएमके 656.5 कोटी

  5. बिजू जनता दल - 944.5 कोटी

  6. वायएसआर काँग्रेस 442.2 कोटी

  7. तेलगू देसम 181.35 कोटी

  8. बीआरएस 1322 कोटी

  9. सपा 14.05 कोटी

  10. अकाली दल 7.26 कोटी

  11. AIADMK - 6.05 कोटी

  12. नॅशनल काँन्फनन्स - 50 लाख

तामिळनाडूच्या सत्ताधारी पक्षाला मार्टिन कंपनीकडून 509 कोटी अनामत देणग्या मिळाल्या. DMK हा काही राजकीय पक्षांपैकी एक आहे ज्यांनी त्यांच्या देणगीदारांची ओळख उघड केली. Megha Engineering ने MK Stalin यांच्या पक्षाला 105 कोटी, India Cements 14 कोटी आणि Sun TV ने 100 कोटी दान केले. (Latest Marathi News)

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सीपीआय(एम), एआयएमआयएम, बसपा यांनी सांगितले की त्यांना निवडणूक रोख्यांद्वारे कोणताही निधी मिळाला नाही.

Electoral Bonds Update
Bihar Loksabha Election 2024 : बिहारमध्ये कन्हैया कुमारच्या तिकिटाला का होतोय विरोध? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

निवडणूक आयोगाने सांगितले की, राजकीय पक्षांकडून मिळालेला डेटा सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. 15 मार्च 2024 रोजीच्या न्यायालयाच्या आदेशावर कार्यवाही करून न्यायालयाच्या रजिस्ट्रीने सीलबंद लिफाफ्यात पेन ड्राइव्हमधील डिजिटल रेकॉर्डसह प्रती परत केल्या. आयोगाने आज त्यांच्या वेबसाइटवर निवडणूक रोख्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडून डिजिटल स्वरूपात प्राप्त केलेला डेटा अपलोड केला आहे.

याआधी गुरुवारी निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांशी संबंधित तपशील आपल्या वेबसाइटवर पोस्ट केला होता. 15 फेब्रुवारी रोजी आपल्या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना असंवैधानिक ठरवून ती रद्द केली होती. निवडणूक रोखे योजना 2 जानेवारी 2018 रोजी सुरू करण्यात आली. या रोख्यांची पहिली विक्री मार्च 2018 मध्ये झाली.

Electoral Bonds Update
Lok Sabha Election 2024 : उमेदवार वाढल्यास निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com