
नवी दिल्ली : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने केलेल्या तक्रारींना निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. मतदारयाद्यांमध्ये मनमानी पद्धतीने नावे वगळणे आणि नवी नावे जोडणे असे प्रकार घडले नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. केवळ सहा मतदारसंघांमध्ये वाढीव नवे मतदार जोडण्यात आले. तरुण मतदारांची संख्या वाढल्यामुळे मतदारयादीमध्ये ही वाढ झाल्याचे आयोगाने म्हटले आहे. तसेच, आयोगाने प्रसिद्ध केलेली मतदानाची टक्केवारीदेखील पारदर्शक असल्याचा दावा करण्यात आला आहे.