Assembly Poll Dates 2023 : त्रिपुरा, मेघालय अन् नागालँडमध्ये विधानसभांचं बिगुल वाजलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election Commission Of India

Assembly Poll Dates 2023 : त्रिपुरा, मेघालय अन् नागालँडमध्ये विधानसभांचं बिगुल वाजलं

Assembly Poll Dates 2023 : ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला तर, नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 2 मार्च रोजी निकाल जाहीर होणार अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी दिली.

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे. तिन्ही राज्यांमध्ये 60-60 सदस्यांच्या विधानसभा आहेत. नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या विधानसभेची मुदत अनुक्रमे १२ मार्च, १५ मार्च आणि २२ मार्च रोजी संपत आहे. 

हेही वाचा: Pune Bypoll Election : पुणे अन् चिंचवडची पोट निवडणूक जाहीर; 'या' तारखेला होणार मतदान

नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये 62.8 लाख मतदार मतदान करण्यास पात्र आहेत. त्यापैकी सुमारे 32 लाख महिला मतदार असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

तिन्ही राज्यांमध्ये निष्पक्ष आणि भयमुक्त निवडणुका पार पाडण्याचा आयोगाला पूर्ण विश्वास असल्याचेही ते म्हणाले.  नागालँडमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. त्यापैकी 12 भाजपकडे, 26 NPF, 17 NDPP आणि 4 इतरांच्या ताब्यात आहेत.