
नवी दिल्ली : बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष मतदार पडताळणी मोहिमेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच प्रियांका गांधी-वद्रा यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. ‘‘मतदार यादीच्या पुनरीक्षणाच्या नावाखाली मतांची चोरी केली जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोग भाजपची ‘निवडणूक चोरी शाखा’ बनला आहे का?, असा उपरोधिक सवाल राहुल गांधींनी केला आहे. तर बिहारमध्ये मतदान बंदी केली जात आहे काय? अशी टीका प्रियांका गांधी केली आहे.