esakal | राज्यसभेच्या एका जागेसाठी ११ सप्टेंबरला होणार पोटनिवडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Election for Rajya Sabha seat on Sept 11

समाजवादी पक्षाचे अमर सिंह यांच्या निधनानंतर त्यांची जागा रिक्त झाली असून निवडणुक आयोगाने (Election Commision) आज (ता. २१) शुक्रवारी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

राज्यसभेच्या एका जागेसाठी ११ सप्टेंबरला होणार पोटनिवडणूक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते (SP Leadear) अमर सिंह यांच्या निधनानंतर (Amar Singh death) राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर ११ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. समाजवादी पक्षाचे अमर सिंह यांच्या निधनानंतर त्यांची जागा रिक्त झाली असून निवडणुक आयोगाने (Election Commision) आज (ता. २१) शुक्रवारी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

अमर सिंह यांना किडनीसंबधित आजार असल्याच्या कारणाने त्यांच्यावर सिंगापूरमधील एका रुग्णालयात उपचार चालू होते. परंतु, उपचारांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांचे निधन झाले. दरम्यान, उत्तर प्रदेशमधून (UP)राज्यसभा सदस्य (RajyaSabha MP) म्हणून निवडून गेले होते. त्यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत असल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आयोगाकडून येत्या २५ ऑगस्ट रोजी अधिकृतरित्या एक आदेश जारी करण्यात येईल. त्या आदेशानुसार ११ सप्टेंबर रोजी मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. 

दरम्यान, अमर सिंग यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. त्यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही झाली होती. उत्तर प्रदेशातील दिग्गज नेत्यांपैकी एक असेलेल्या अमर सिंग हे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जात होते. समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर राजकारणातही ते फारसे सक्रीय नव्हते. 5 जुलै 2016 मध्ये त्यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली होती. दरम्यान, आजारी पडण्याआधीच त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही राज्यसभेपासूनच झाली होती. 1996 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभा खासदार झाले होते. त्यानंतर 2002 आणि 2008 मध्येही ते राज्यसभेचे खासदार झाले होते.

loading image