esakal | LJP Election Symbol |चिराग पासवान 'हेलिकॉप्टर'ने मागणार मत, वडिलांच्या नावाने काढला पक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

chirag-paswan

चिराग पासवान 'हेलिकॉप्टर'ने मागणार मत, वडिलांच्या नावे पक्ष

sakal_logo
By
ओमकार वाबळे

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे सुपुत्र चिराग पासवान यांना निवडणूक आयोगाने नवे चिन्ह दिले आहे. लोक जनशक्ती पार्टीचे चिन्ह वापरण्यास निवडणूक आयोगाने चिराग पासवान यांना परवानगी नाकारली होती. केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस आणि चिराग पासवान यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने निवडणूक आयोगाने चिन्हासंदर्भात निर्णय दिला होता.

अखेर चिराग पासवान यांना हेलिकॉप्टर या चिन्हाचा वापर करता येणार आहे. हे चिन्ह चिराग यांच्या लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) या गटासाठी असणार आहे. तर पशुपती कुमार पारस यांच्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीला शिवण यंत्राचे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे काका पुतण्यातील वाद निवडणूक आयोगाने मिटवल्याचं चित्र आहे.

चिराग पासवान यांना बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्वत:च्याच पक्षातून त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांनी निलंबित केलं होतं. रामविलास पासवान यांच्यानंतर पक्षाची धुरा कोणाच्या हातात जाणार यावरून हा संघर्ष सुरू झाला होता. यानंतर चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) हा वेगळा गट स्थापून राजकीय अजेंडा पुढे नेण्याचे ठरवले. मात्र, पक्षाचे जुने चिन्ह वापरण्यावरून वाद पेटला. चिराग यांना ते वापरता येणार नाही, यासाठी निवडणूक आयोगाने पत्र लिहिले. मात्र त्यानंतर आता हा वाद मिटला आहे. निवडणूक आयोगाने लोकशक्ती पार्टीच्या दोन्ही गटांना चिन्हे वितरित केली आहेत.

loading image
go to top