Electronic Voting Machine : ईव्हीएम मशिनचा वापर सर्वात आधी कोणत्या राज्यात करण्यात आला होता? जाणून घ्या EVM चा रंजक इतिहास

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा या ४ राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे.
Electronic Voting Machine
Electronic Voting Machineesakal

Electronic Voting Machine : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा या राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. त्याची मतमोजणी सध्या सुरू आहे.

या निवडणुकांची मतमोजणी ज्या मशिनद्वारे केली जाते. ते मशिन म्हणजे ईव्हीएम (Electronic Voting Machine) मशिन होय. मध्यंतरी या ईव्हीएम मशिनमुळे चांगलाच वाद-विवाद रंगला होता. त्यामुळे, हे ईव्हीएम मशिन चांगलेच चर्चेत आले होते.

परंतु, तुम्हाला या ईव्हीएम मशिनचा इतिहास माहित आहे का? या मशिनचा वापर सर्वात आधी कुठे करण्यात आला होता? या संदर्भातली रंजक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

ईव्हीएम मशिनचा इतिहास

भारतात पहिल्यांदा या ईव्हीएम मशिनचा शोध हा १९८० मध्ये लावण्यात आला होता. एम.बी.हनिफा यांनी या मशिनचा शोध लावला होता. हनिफा यांनी १५ ऑक्टोबर १९८० रोजी इलेक्ट्रॉनिकली ऑपरेटेड व्होट काऊंटिंग मशिन म्हणून याची नोंदणी केली होती.

एम.बी.हनिफा यांनी एकात्मिक सर्किट्सचा वापर करून मूळ ईव्हीएम मशिन डिझाईन केले होते. हे ईव्हीएम मशिन त्यावेळी तामिळनाडूच्या ६ शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरकारी प्रदर्शनात जनतेसाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी, लोकांनी सर्वात आधी हे ईव्हीएम मशिन पाहिले होते. त्यानंतर, निवडणूक आयोगाने याचा वापर करण्याचा विचार केला.

त्यानंतर, १९८९ मध्ये भारतातील ईव्हीएम मशिनचे उत्पादन भारतीय निवडणूक आयोगाने ‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या’ सहकार्याने सुरू केले. ईव्हीएमचे औद्योगिक डिझायनर ‘औद्योगिक डिझाईन सेंटर IIT Bombay’ चे फॅकल्टी सदस्य होते.

EVM मशिनचा वापर सर्वात आधी कोणत्या राज्यात करण्यात आला ?

देशात ईव्हीएम मशिनचा वापर हा सर्वात आधी १९८२ मध्ये मे महिन्यात करण्यात आला होता. त्यावेळी, केरळच्या परावूर विधानसभेतील ५० मतदान केंद्रांवर या मशिनचा वापर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर एका उमेदवाराने निवडणुकीतील त्याच्या पराभवाचे श्रेय हे ईव्हीएम मशिनला दिले होते.

त्या उमेदवाराचे नाव एस. सी. जोस असे होते. जोस यांनी ईव्हीएम मशिनचा निवडणुकीत करण्यात आलेला वापर आणि निकालांना न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर, कोर्टाने पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाने ईव्हीएम मशिनमध्ये कोणताही बिघाड झाल्याचा संशय व्यक्त केला नाही.

काही काळापर्यंत EVM मशिनचा वापर करण्यात आला नव्हता

देशात ईव्हीएम मशिनचा वापर सुरू तर झाला मात्र, १९८३ नंतर काही वर्षांपर्यंत ईव्हीएमचा वापर करण्यात आला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, १९८८ मध्ये डिसेंबर महिन्यात संसदेत कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मध्ये कलम 61 A जोडण्यात आले. ज्या अंतर्गत निवडणूक आयोगाला मतदान यंत्र वापरण्याचा अधिकार प्राप्त झाला.

ज्या ईव्हीएम मशिनची निर्मिती १९८९-९० च्या दरम्यान करण्यात आली होती, त्यांचा वापर नोव्हेंबर १९९८ च्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आला होता. या मशिनचा प्रयोग म्हणून वापर हा मध्य प्रदेशातील पाच, राजस्थानच्या ६ आणि दिल्लीतील ६ विधानसभा मतदारसंघात करण्यात आला होता. परंतु, २००४ नंतर सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनचा वापर केला जाऊ लागला.

Electronic Voting Machine
EVM Machine : मतमोजणी सुरू असताना लाईट गेली तर काय केलं जातं? खरंच सुरक्षित असतात का EVM मशिन्स?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com