M. Venkaiah Naidu : आणीबाणीसाठी काँग्रेसने माफी मागावी : एम. वेंकय्या नायडू
Indian Democracy : १९७५ च्या आणीबाणी काळात नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर कठोर मर्यादा लादण्यात आल्या होत्या, अशी टीका माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी केली. काँग्रेसने आजही याबद्दल जनतेची माफी मागितलेली नाही, यावरही त्यांनी आक्षेप घेतला.
हैदराबाद : देशात १९७५ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने लादलेल्या आणीबाणीत व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करण्यात आला. या काळात अत्यंत कठोर अन् दडपशाहीच्या कारवाया करण्यात आल्या, अशी टीका माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केली.