‘फाइव्ह-जी’ तंत्रज्ञानाच्या विकासावर भर; ‘यूपीआय’ उपायांचे राष्ट्रपतींकडून कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digital-India
‘फाइव्ह-जी’ तंत्रज्ञानाच्या विकासावर भर; ‘यूपीआय’ उपायांचे राष्ट्रपतींकडून कौतुक

‘फाइव्ह-जी’ तंत्रज्ञानाच्या विकासावर भर; ‘यूपीआय’ उपायांचे राष्ट्रपतींकडून कौतुक

नवी दिल्ली : ‘डिजिटल इंडिया’ (digital india)आणि अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने ‘युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस’च्या (यूपीआय) यशासाठी केंद्र सरकारने (central government)केलेल्या उपाययोजनांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद(president ramnath covind) यांनी आज तोंडभरून कौतुक केले. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेला उद्देशून केलेल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले,‘‘ मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ‘यूपीआय’च्या माध्यमातून आठ लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक रकमेचे व्यवहार झाले आहेत. बचत गटांच्या सदस्य असणाऱ्या देशभरातील हजारो महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना ‘बॅंकिंग सखी’ म्हणून यात सामावून घेण्यात आले आहे, याच महिला ग्रामीण भागामध्ये बॅंकिंग सेवा पोचविण्याचे काम करत आहेत. देशातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सरकार फाइव्ह-जी वायरलेस तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देत आहे.

हेही वाचा: 50 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनायक पाटणकर, विशेष संवाद; पाहा व्हिडिओ

‘सेमी कंडक्टर’संदर्भातील ‘पीएलआय स्कीम’च्या माध्यमातून आमच्या स्टार्टअपसाठीची इकोसिस्टिमला बूस्टर मिळेल.’’ पेटंट आणि ट्रेडमार्क सेक्टरसाठी केंद्र सरकारने विविध नियम शिथिल केले असून त्यामुळे पेटंटसाठी सहा हजार अर्ज आले असून ट्रेडमार्कसाठी २० हजार अर्ज (२०२१-२२) आले आहेत, असेही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: लेफ्टनंट जनरल जीएवी रेड्डी देशाच्या संरक्षण गुप्तचर संस्थेचे नवे प्रमुख

राष्ट्रपती म्हणाले (president of india)

  1. देशभरातील ७० टक्के लोकांचे लसीकरण(vaccination) पूर्ण

  2. सर्वांत मोठ्या अन्नधान्य वितरण कार्यक्रमाची अंमलबजावणी

  3. शेतकरी, कामगारांसाठी नव्या उपाययोजना

  4. महिला सशक्तीकरणासाठी उपाययोजनांची आखणी

  5. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताची ताकद दिसली

  6. स्टार्टअप, सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी मोठे काम

Web Title: Emphasis On The Development Of Five G Technology President Lauds Upi Measures Ramnath Covind Desh News Digital India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top