काश्‍मीरमध्ये कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची

जावेद मात्झी
शनिवार, 23 जून 2018

प्रशासनाला गती आणि कामाची वेळ निश्‍चित करण्यासाठी या बायोमेट्रिक पद्धतीला आजपासून सुरवात करण्यात आली.

श्रीनगर : प्रशासनाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी जम्मू काश्‍मीर सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी आता सक्तीची केली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने सांगितले की, प्रशासनाला गती आणि कामाची वेळ निश्‍चित करण्यासाठी या बायोमेट्रिक पद्धतीला आजपासून सुरवात करण्यात आली.

यामध्ये अधिकाऱ्यापासून ते अगदी शिपायापर्यंत सर्व जणांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. जे कोणी या बायोमेट्रिक सिस्टीममध्ये आपली नावनोंदणी करणार नाहीत, त्यांचे जून महिन्याचे वेतन काढण्यात येणार नाही, असेही या पत्रकात म्हटले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कर्मचारी, करार पद्धतीने काम करणारे आणि अन्य कोणत्याही प्रकारचे काम करणारे या सर्वांना हा आदेश लागू असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employees in Kashmir must have biometric attendance compulsory