esakal | पुलवामात लष्कर- ए- तोयबाच्या कमांडरसह तिघांचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

army

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळालं आहे. मोठ्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी लष्कर- ए- तोयबाच्या कमांडर एजाज उर्फ अबू हुरैराचा खात्मा केला आहे.

पुलवामात लष्कर- ए- तोयबाच्या कमांडरसह तिघांचा खात्मा

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळालं आहे. मोठ्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी लष्कर- ए- तोयबाच्या कमांडर एजाज उर्फ अबू हुरैराचा खात्मा केला आहे. याशिवाय दोन स्थानिक दहशतवाद्यांना मारण्याच यश आलं आहे. यासंबंधी काश्मीर झोनच्या आयजीने माहिती दिली आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामामध्ये दीर्घकाळ चाललेल्या या संघर्षानंतर हे यश मिळालं आहे. गेल्या महिन्यात सुरक्षा दलांनी अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं आहे.

दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर चकमक सुरु झाली. सुरक्षा दलांना परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. यादरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. याला सुरक्षा दलांनी सडेतोड उत्तर दिलं. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्याही ऑपरेशन सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.

लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

पोलिस प्रवक्त्याने सांगितलं की, दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पूलवामा शहराच्या मुख्य कॉलिनीत मंगळवारी रात्री राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष अभियान गट (एसओजी) आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बल (सीआरपीएफ) यांनी संयुक्त ऑपरेशन राबवले. सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या जवळ पोहोचले, तेव्हा त्यांनी गोळीबार सुरु केला. तत्काळ आसपास राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. तसेच दहशतवाद्यांना आत्मसमर्पन करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. पण, त्यांनी गोळीबार सुरु ठेवल्याने जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यात लष्कर- ए- तोयबाच्या कमांडर एजाज उर्फ अबू हुरैरा याला मारण्यात यश आलं.

loading image