Moosewala Case : संशयीत मारेकरी, पोलिसांमध्ये एन्काऊंटर; दाेन ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Moosewala encounter
Moosewala Case : मुसेवालाचे संशयीत मारेकरी, पंजाब पोलिसांमध्ये एन्काऊंटर!

Moosewala Case : संशयीत मारेकरी, पोलिसांमध्ये एन्काऊंटर; दाेन ठार

अमृतसर : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या खूनप्रकरणातील दोन कुख्यात गुंड, शार्प शूटरचा आज पंजाब पोलिसांनी चकमकीमध्ये खातमा केला. पाकिस्तान सीमेपासून दहा किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या भकना गावामध्ये तब्बल पाच तास ही चकमक चालली. जगरूपसिंग रूपा आणि मनप्रित सिंग अशी या चकमकीमध्ये ठार झालेल्या गुंडांची नावे आहेत. या चकमकीनंतर माध्यमांशी बोलताना पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव म्हणाले की, ‘‘ मागील अनेक दिवसांपासून आम्ही या आरोपींच्या मागावर होतो.

टास्क फोर्सला या भागामध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या, यंत्रणेकडून माहिती मिळताच आम्ही वेगाने कारवाई केली. घटनास्थळावरून एके-४७ रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या चकमकीमध्ये तीन पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.’’ दुसरीकडे अटारीचे आमदार जसविंदरसिंग रामदास यांनी चकमकीमध्ये चार गुंडांचा खातमा करण्यात आल्याचा दावा केला आहे. ठार झालेले अन्य हे दहशतवादी आहेत की गुंड याबाबत पोलिसांनी ठोस माहिती दिलेली नाही. सीमावर्ती भागामध्ये दबा धरून बसलेले हे सगळे हल्लेखोर पाकिस्तानात पळून जायच्या तयारीमध्ये होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

परिसर सील

आजच्या कारवाईमध्ये अँटी गँगस्टर टास्क फोर्स, स्पेशल ऑपरेशन सेल आणि ऑर्गनाईज्ड क्राइम कंट्रोल युनिटचे जवान सहभागी झाले होते. पोलिस दलाचे बेस्ट शूटर आणि जलदगतीने कारवाई करणारे पथक देखील घटनास्थळी पोचले होते. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन किलोमीटरपर्यंतचा परिसर सील केला होता.

Web Title: Encounter Underway Between Punjab Police And Two Suspected Moosewala Killers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top