माझे पत्नीवर प्रेम तर तिचे शेजारच्यावर...

वृत्तसंस्था
Tuesday, 24 September 2019

माझ्या पत्नीवर माझे खूप प्रेम होते. पण, तिचे प्रेम शेजारी राहणाऱया युवकावर. दोघांच्या संबंधाबाबत मला समजले होते.

नवी दिल्ली: माझ्या पत्नीवर माझे खूप प्रेम होते. पण, तिचे प्रेम शेजारी राहणाऱया युवकावर. दोघांच्या संबंधाबाबत मला समजले होते. टीव्ही व इंटरनेटवर माहिती घेऊन पत्नीचा खून केला, अशी माहिती एका सॉफ्टवेअर अभियंताने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.

राजधानीमधील प्रेम नगर भागामध्ये अनैतिक संबंधावरून पत्नी सीमाचा गळा दाबून हत्या केल्यानंतर शरीराचे तुकडे केले. पत्नीचा खून केल्यानंतर व पुरावे नष्ट करण्यासाठी टीव्हीवरील क्राईम मालिका व इंटरनेटच्या माध्यमातून सर्च केले, अशी माहिती पती आशूने पोलिसांना दिली.

आशूने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, 'पत्नीवर माझे प्रेम होते. परंतु, शाजरी राहणाऱया युवकासोबत तिचे अनैतिक संबंध असल्याचा मला संशय होता. यामुळे आमच्या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. एक आठवडापूर्वी बाजारामधून चादर खरेदी केली व पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर तुकडे करून चादरीमध्ये ठेवले होते. मृतदेहाचे थोडे-थोडे तुकडे गटारामध्ये फेकून दिले. शेवटी, चादरही फेकून दिली. यासाठी टीव्ही व इंटरनेटचा आधार घेतला.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: engineer big revealing in police inquiry after wife killed and chopped her body at delhi