esakal | 'ओवैसी बालमित्र, तर मोहन भागवत मामा', रविवारच्या सुट्टीसाठी अभियंत्याचे अजब पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

अभियंता राजकुमार यादव

'ओवैसी बालमित्र, तर मोहन भागवत मामा', रविवारच्या सुट्टीसाठी अभियंत्याचे अजब पत्र

sakal_logo
By
टीम ई सकाळ

एका अभियंत्याने रविवारची सुट्टी घेण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढविली. त्यांनी एक अजब पत्र लिहून आपल्या बॉसला सुट्टी मागितली. ''माझ्या मागच्या जन्मातील आठवणी जाग्या झाल्या असून असुद्दीन ओवैसी हे माझे लहानपणीचे मित्र होते, तर मोहन भागवत मामा होते. त्यामुळे माझ्या जीवनात काय घडलं होतं, हे जाणून घेण्यासाठी मी गीतेचा अभ्यास करू इच्छितो'' असं पत्र अभियंत्याने लिहिलं होतं. बॉसने देखील मजेशीर उत्तर दिले.

हेही वाचा: २५ वर्षीय तरुणाचा विधवेवर बलात्कार, एकटी राहत असल्याचा गैरफायदा

मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील सुसनेर जनपद येथे कार्यरत असणारे अभियंता राजकुमार यादव यांनी आपल्या बॉसला पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी लिहिले की, ''मी जनपदच्या कुठल्याही कार्यक्रमात उपस्थित राहू शकत नाही. कारण, मला आत्मा अमर असल्याचा भास झाला आहे. तसेच मागच्या जन्माबाबत देखील मला माहिती मिळाली आहे. त्या जन्मात ओवैसी हे माझे मित्र नकुल होते, तर मोहन भागवत शकुनी मामा होते. त्यामुळे माझ्या जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी गीतेचा अभ्यास करू इच्छितो. तसेच माझ्यातील अहंकार दूर करण्यासाठी घरोघरी जाऊन भीक मागायची आहे. त्यामुळे मला रविवारची सुट्टी द्यावी'', अशी विनंती त्यांनी पत्रातून केली होती. याबाबत 'आज तक'ने वृत्त दिले आहे.

जनपद पंचायत सुसनेरच्या ऑफिशियल ग्रुपवर हे पत्र टाकण्यात आले. त्यावर जनपद पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग पंथी यांनी अभियंत्याच्या भाषेत त्याला उत्तर दिले. त्यांनी पत्राला उत्तर देताना लिहिले की, ''प्रिय अभियंता, तुम्ही तुमच्यातील अहंकाराची भावना दूर करू इच्छिता ही खूप मोठी गोष्ट आहे. यामध्ये तुम्हाला आमचे देखील सहकार्य मिळेल. एखादी व्यक्ती अहंकारी असते आणि त्याला वाटते की तो आपला रविवार स्वतःच्या इच्छेनुसार घालवू शकतो. हा अहंकार घालवणे आपल्या प्रगतीसाठी चांगले आहे. त्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगतीची इच्छा लक्षात घेऊन तुम्हाला प्रत्येक रविवारी कार्यालयात उपस्थित राहून काम करण्याचा आदेश दिला जात आहे. त्यामुळे रविवार सुट्टी म्हणून साजरा करण्याचा तुमचा अहंकार कमी होईल. तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये साधक बनल्याचे मला समाधान आहे.'', असं भन्नाट उत्तर देत बॉसने त्या अभियंत्याला प्रत्येक रविवारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

loading image
go to top