
एका मोठ्या रुग्णालयामध्ये एक इंजिनियर गेला आणि महिला डॉक्टरला प्रपोज करू लागला. रुग्णालयातील अन्य डॉक्टरांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णालयातील प्रपोजची चर्चा परिसरात रंगली आहे.
रांची (झारखंड): शहरामधील एका मोठ्या रुग्णालयामध्ये एक इंजिनियर गेला आणि महिला डॉक्टरला प्रपोज करू लागला. रुग्णालयातील अन्य डॉक्टरांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णालयातील प्रपोजची चर्चा परिसरात रंगली आहे.
महिला डॉक्टरला म्हणाला घरी चला अन् गेल्यावर...
अभय कुमार असे अटक केलेल्या इंजिनियरचे नाव असून, त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय कुमार रुग्णालयात आला होता. महिला डॉक्टरचा हात धरून त्याने प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला डॉक्टरने त्याच्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटना इतर डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला पकडले. पोलिसांना बोलावल्यानंतर त्याला ताब्यात दिले. गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
प्रियकराच्या मृतदेहावर बसून राहिली तब्बल अडीच महिने...
अभय कुमारने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, संबंधित डॉक्टर माझी प्रेयसी आहे. आमची नियमीतपणे भेट होत आहे. परंतु, सध्या चिडल्यामुळे माझ्याशी बोलत नाही. तिचा राग दूर करण्यासाठी रुग्णालयात आलो होतो.