
देशातील अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम होणार ११ भाषांतून
नवी दिल्ली - नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy) हे नव्या पिढीला, शिक्षणाचे नवे अवकाश खुले करणारे आहे. गरीब आणि मागासलेल्या वर्गांतील विद्यार्थ्यांपर्यंत (Student) आता त्यांच्या मातृभाषेतून तांत्रिक शिक्षण मिळेल. त्यासाठी देशातील अकरा भाषांत (Language) अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम (Engineering Syllabus) तयार केला जात आहे. त्याच्या अंमलबजावणीची सुरवात महाराष्ट्रासह अन्य आठ राज्यांपासून केली जाईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. (Engineering Courses Country Conducted in 11 Languages)
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘नवे शैक्षणिक धोरण हा राष्ट्रबांधणीचा महायज्ञ आहे. छोट्या गावातील तरुणांमध्ये कमालीची प्रतिभा आहे. ते ऑलिंपिकबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) ते मशिन लर्निंग या क्षेत्रांत भरारी घेत आहे. त्यांना अनुकूल असे वातावरण आणि शिक्षण आपण दिल्यास भारत आत्मनिर्भर होईल. त्यासाठी शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय आणला आहे.’’
हेही वाचा: जावेद अख्तर, शबाना आझमींनी का घेतली 'ममतां'ची भेट?
शिक्षकांसाठी निष्ठा योजना
विद्या प्रवेश या योजनेमुळे विद्यार्थी गरीब असो श्रीमंत त्याला प्राथमिक शिक्षण हसत्या खेळत्या वातावरणा होईल. याशिवाय देशातील तीन लाख विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेत शिक्षण द्यावे लागते. आता भारतीय सांकेतिक भाषा हा विषयाच्या स्वरूपात माध्यमिक स्तरापासून शिकविला जाणार आहे. आपले शिक्षक हे ज्ञानव्यवस्थेचा कणा आहे. त्यांना ‘निष्ठा’ या योजनेमार्फत आधुनिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Web Title: Engineering Courses Country Conducted In 11 Languages
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..