

नवी दिल्ली : तुम्ही वारंवार हायवेवरुन प्रवास कारावा लागतो आणि त्यासाठी भरमसाठ टोलही द्यावा लागतोय? मग आता तुमची या सततच्या टोलपासून मुक्तता होणारेय. कारण यासाठी सरकारनं एक भन्नाट प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनमुळं तुम्हाला लाईफटाइम 'टोल फ्री' प्रवास करता येणार आहे. त्यामुळं लोकांना दैनंदिन टोलच्या आर्थिक कटकटीतून दिलासा मिळेल.