esakal | EPFO : भविष्य निर्वाह निधीवर मिळणार इतकं व्याज; जाणून घ्या कसा चेक करणार बॅलन्स
sakal

बोलून बातमी शोधा

epfo

केंद्रीय श्रम मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर २०२०-२१ साठी व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

EPFO : भविष्य निर्वाह निधीवर मिळणार इतकं व्याज; जाणून घ्या कसा चेक करणार बॅलन्स

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

केंद्रीय श्रम मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर २०२०-२१ साठी व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचा ८.५ टक्के व्याजदर यंदाही कायम राहणार आहे. गुरुवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय मंडळाची श्रीनगरमध्ये बैठक पार पडली, यावेळी हा निर्णय घेण्यात आला.    

कोणत्या वर्षी किती मिळालं व्याज?

             वर्ष                व्याजदर (टक्के) 

 1. २०१३-१४             ८.७५
   
 2. २०१४-१५            ८.७५
   
 3. २०१५-१६            ८.८०
   
 4. २०१६-१७           ८.६५
   
 5. २०१७-१८           ८.५५
   
 6. २०१८-१९           ८.६५
   
 7. २०१९-२०           ८.५०

ईपीएफओतच व्याजाचा सर्वाधिक लाभ

कोरोनाच्या काळात अनेक योजनांवर मिळणारं व्याज कमी झालं आहे. मात्र, ईपीएफच्या खात्यांमध्ये अधिक व्याज मिळत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) प्रत्येक वित्तीय वर्षासाठी पीएफच्या रक्कमेवर व्याजदराची घोषणा करत असते. चालू आर्थिक वर्षात ईपीएफओने ८.५ टक्के दरानं व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मिस्ड कॉल देऊन जाणून घेऊ शकता पीएफ बॅलन्स

एका मिस्डकॉलद्वारे आपण पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर क्रमांकाने ०११-२२९०१४०६ वर मिस्ड कॉल देऊनही माहिती मिळवता येऊ शकते. यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल यामध्ये आपल्या अकाउंटमध्ये असलेल्या पैशांची माहिती मिळू शकेल. 

एसएमएसद्वारे बॅलन्स जाणून घेण्यासाठी या क्रमांकावर मेसेज करा

याशिवाय आपण एक मेसेज करुनही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकतात. मात्र, या दोन्ही सेवांसाठी आपलं युएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) अॅक्ट्विह असायला हवा. जर आपण एसएमएसच्या माध्यमातून पीएफचा बॅलन्स जाणून घेऊ इच्छित असाल तर EPFOHO UAN असं टाइप करुन 7738299899 या क्रमांकावर पाठवून द्या. या सेवेचा लाभ आपण मराठी, हिंदी, इंग्रजीसह १० भाषांमध्ये करु शकता. उदारण म्हणजे जर तुम्हाला मराठीत बॅलन्स जाणून घ्यायचा असेल तर EPFOHO UAN MAR ७७३८२९९८९९ येथे मेसेज करु शकता. 

विविध भाषांसाठी विविध कोड आहेत 

इंग्रजी साठी कोणताही कोड नाही.
हिंदी - HIN
पंजाबी - PUN
गुजराती - GUJ
मराठी - MAR
कन्नड - KAN
तेलगू - TEL
तमिळ - TAM
मल्याळम - MAL
बंगाली - BEN
 

loading image
go to top