राजकारणात जायला बायको नाही म्हणते - रघुराम राजन

वृत्तसंस्था
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली: पत्नीने नकार दिल्यामुळे आपण राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापुढेही मी कधी राजकारणात येणार नाही, असा गौप्यस्फोट रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला. नवी दिल्लीत झालेल्या टाईम्स लिटफेस्ट या कार्यक्रमात राजन यांची मुलाखत झाली. त्यावेळी त्यांना अरविंद केजरीवाल यांचा पक्ष असलेल्या 'आम आदमी पक्षा'ने देऊ केलेल्या ऑफरबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच राजन यांना आम आदमी पक्षाच्या वतीने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र राजन यांनी त्याला साफ नकार दिला.

राजकारणात येण्याबाबत त्यांच्या पत्नीशी चर्चा केली. मात्र त्यांच्या पत्नीने त्यांना राजकारणात प्रवेश करण्यास नकार दिला. राजन म्हणाले की, “मला राजकारणात आजही रस नाही. मी रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर होतो, तेव्हा लोक मला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत पाठवू इच्छित होते. आता मी प्राध्यापक झालो आहे, तर ते मला अन्यत्र पाहू इच्छितात. पण प्राध्यापक म्हणून मी अत्यंत आनंदी आहे आणि मला माझे काम आवडते.”

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: esakal marathi news raghuram rajan entry politics news