
मराठी डिजिटल पत्रकारितेत सकाळ.कॉमने आपली आघाडी कायम ठेवली आहे. मे महिन्यानंतर जून २०२५ मध्येही सकाळ.कॉम महाराष्ट्रातील नंबर एकची न्यूज वेबसाईट बनली आहे. कॉमस्कोर (Comscore) च्या ताज्या अहवालानुसार, जून २०२५ मध्ये तब्बल २१.२ दशलक्ष (मिलियन) युनिक वाचकांनी eSakal.com ला भेट दिली. यामुळे eSakal.com सलग दुसऱ्या महिन्यात महाराष्ट्रातील नंबर एक डिजिटल वृत्तसंकेतस्थळ बनले आहे.
या यशाने eSakal.com ने लोकमत, एबीपी माझा (ABP Majha), टीव्ही९ मराठी (TV9 Marathi) आणि लोकसत्ता यांसारख्या मोठ्या ब्रँड्सना मागे टाकत आपली आघाडी कायम ठेवली आहे.