
अरुणाचलच्या टेंगा खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज विराजमान
टेंगा - छत्रपती शिवाजी महाराज शौर्याची गाथा आता अगदी देशाच्या ईशान्येकडील अरुणाचलपर्यंत पोहचली आहे. येथील टेंगा खोऱ्यात तैनात असलेल्या १ मराठा लाईट इन्फंट्री तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांची विशाल मूर्ती स्थापित केली आहे. सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात जवानांनी त्यांच्याकडून लढण्याची ताकद आणि प्रेरणा मिळत राहो, यासाठी मराठा चौकात ही मूर्ती स्थापित केली असून ते सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
टेंगाच्या मराठा चौक बस थांबा येथे ही मूर्ती असून या वर्षी एप्रिल महिन्यात ती स्थापित करण्यात आली. येथील स्थानिकांना महाराजांबाबत माहिती व प्रेरणा मिळावी यासाठी स्थानिकांना ही मूर्ती समर्पित करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या बाहेरून ही मूर्ती थेट रस्त्या मार्गी आणली गेली आहे. हातात तलवार घेऊन घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज अशी ही प्रतिकृती. ही मूर्ती १२ फूट उंच असून याचे वजन सुमारे २०० किलो आहे.
Web Title: Establishment Of Statue Of Maharaj By 1 Maratha Light
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..