आंतरराज्य जलतंट्यासाठी कर्नाटकात उपसमिती स्थापना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

बेळगाव - कृष्णा, कळसा - भांडूराबरोबर (म्हादाई) कावेरी नदी पाणी वाटप संदर्भात विविध राज्यांशी कर्नाटकाचे मतभेद आहेत. वाद मिटवून पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यंमत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उपसमिती कर्नाटकाने स्थापली आहे. उपसमितीत पाठबंधारे, गृहमंत्री आणि महसूल मंत्र्यांचा समाविष्ट आहे. 

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची अलिकडे बैठक झाली आहे. त्या बैठकीत विविध राज्यांशी पाणी वाटपावरून असणारे मतभेद मिटविण्यासाठी उपसमिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

विद्यमान गृहमंत्री व माजी पाठबंधारे मंत्री बसवराज बोम्मई, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, महसूल मंत्री आर. अशोक यांचा या समितीमध्ये समावेश आहे. कृष्णा व म्हादाई जलतंटा विषयावर सर्वोच्च न्यायालयात निकाल लागले आहेत. त्याची अंमलबजावणी आणि मतभेद बातचीत माध्यमातून सोडविण्याचा विचारही उपसमितीचा आहे. 

म्हादाई जलतंटा, अलमट्टी धरणाची उंची वाढविणे, उन्ह्याळ्यात कृष्णा काठावरील जनतेला पाणी सोडण्यासाठी महाराष्ट्र - कर्नाटक पाणी वाटप करार करण्याची अट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातली आहे. या स्वरुपाच्या पाणी प्रश्‍नांवर उपसमिती चर्चा करणार आहे. 

पूरस्थितीचा अभ्यास समिती करणार 
अतिवृष्टी व महाराष्ट्र पाणलोट क्षेत्रातील विसर्गमुळे कर्नाटकातील बेळगाव, बागलकोटसह विविध जिल्ह्यात पूरस्थिती आली. भविष्यामध्ये पूरस्थिती उद्‌भविणार नाही, त्याची काळजी घेण्यासाठी उपसमिती चर्चा करणार आहे. तसेच उन्हाळ्यात कृष्णा नदीला कोयनेचे पाणी सोडण्यासाठी करार विषयाचा उपसमिती अभ्यास करणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of sub-committee in Karnataka for inter-state water dispute