

Europe Battles Record Heat: Thousands Affected, 18 Cities Under Red Alert
sakal
बर्लिन: स्वित्झर्लंडपासून चेक प्रजासत्ताक आणि डेन्मार्कपर्यंत शनिवारी तापमानाने उच्चांकी पातळी गाठली. पश्चिम युरोपीय देशांमध्ये या आठवड्यात सुरू असलेली उष्णतेची लाट आता खंडाच्या मध्य आणि पूर्व भागांकडे सरकली आहे.
कडाक्याच्या उन्हाळ्यासाठी परिचित नसलेल्या नॉर्डिक देशांमध्येही असामान्य तापमानाची नोंद झाली आहे. डेन्मार्कच्या हवामान संस्थेने आरहूसच्या उत्तरेकडील ओडम येथे ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली आहे. १८७४ मध्ये नोंदी सुरू झाल्यापासूनचा हा तेथील सर्वांत उष्ण दिवस ठरला आहे. स्वित्झर्लंडमधील बासेल शहरात ३८.८ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली.