esakal | पंतप्रधान झाल्यानंतरही मोदी आपली मूळं विसरले नाहीत; आझाद यांच्याकडून कौतूक

बोलून बातमी शोधा

azad_modi}

काँग्रेस पक्षावर नाराज असलेल्या 'ग्रुप २३' नेत्यांपैकी एक आणि नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झालेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच कौतुक केलं आहे.

पंतप्रधान झाल्यानंतरही मोदी आपली मूळं विसरले नाहीत; आझाद यांच्याकडून कौतूक
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

काँग्रेस पक्षावर नाराज असलेल्या 'ग्रुप २३' नेत्यांपैकी एक आणि नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झालेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच कौतुक केलं आहे. मोदींना जमिनीशी जोडलेला नेता संबोधताना यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही आपली मूळं कशी लक्षात ठेवायची हे त्यांच्याकडून शिकायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. मोदी आपल्या बालपणी चहा विकत असल्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी आपलं सत्य कधीही लपवलं नसल्याचही आझाद यांनी म्हटलं आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये एका सभेत बोलताना आझाद म्हणाले, "अनेक नेत्यांच्या अनेक बाबी आपल्याला चांगल्या वाटतात. मी स्वतः गावात जन्मलो आणि वाढलो त्यामुळे मला याचा अभिमान वाटतो. आपले पंतप्रधानाही ग्रामीण भागातून आल्याचे सांगतात. बालपणी आपण भांडी घासण्याचे, चहा विकण्याचं काम केल्याचंही ते सांगतात. आम्ही त्यांच्या विरोधात आहोत पण ते आपलं खरेपण कधीही लपवत नाहीत, जर तुम्ही तुमचं खरेपण लपवलं तर तुम्ही यांत्रिक जगात जगत आहात." 

खासगी रुग्णालयांमध्ये मिळू शकणार २५० रुपयांत करोना प्रतिबंधक लस

दरम्यान, गुलाम नबी आझाद हे राज्यसभेतून निवृत्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं सभागृहात खूपच कौतूक केलं होतं. तसेच त्यांच्याशी संबंधित एका घटनेचा उल्लेख करताना मोदी भावूकही झाले होते. 

उद्यापासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोना लस, पण वयाची अट; पाहा लसीकरण केंद्रांची यादी

आझादी काँग्रेस पक्षाचे त्या २३ नेत्यांपैकी एक प्रमुख चेहरा आहेत ज्यांनी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची मागणी लावून धरली आहे. कालच या नेत्यांनी जम्मू येथे सभा घेतली होती यावेळी यातील नेत्यांनी काँग्रेसला आपल्याला अधिक सक्षम बनवायचे आहे असं म्हटलं होतं.