भाजप मंत्री म्हणतात, श्रीराम पण 'ही' हमी देऊ शकत नाहीत

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

या प्रकरणी दोषी असलेल्यांना अटक करण्यात  आली असून, त्यांना नक्की शिक्षा केली जाईल. आपण म्हणत असाल, की आपला समाज 100 टक्के गुन्हे मुक्त झाला पाहिजे. पण, प्रभू श्रीरामही याची हमी देऊ शकत नाहीत.

बाराबंकी : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला जाळून मारल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका होत असताना उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री रघुवेंद्र प्रताप सिंह म्हणाले आहेत, की प्रभू श्रीरामही 100 टक्के गुन्हामुक्त समाजाची हमी देऊ शकत नाहीत. 

अन्नधान्य पुरवठा मंत्री रघुवेंद्र सिंह म्हणाले, की या प्रकरणी दोषी असलेल्यांना अटक करण्यात  आली असून, त्यांना नक्की शिक्षा केली जाईल. आपण म्हणत असाल, की आपला समाज 100 टक्के गुन्हे मुक्त झाला पाहिजे. पण, प्रभू श्रीरामही याची हमी देऊ शकत नाहीत. मोदीजी आणि योगीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दोषींना कधीच पाठिंबा देणार नाही. 

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेवर गुरुवारी सकाळी न्यायालयाकडे जात असताना नराधमांनी हल्ला करत तिला पेटवून दिले होते. अखेर आज (शनिवार) सुमारे 40 तासांनी तिच्या किंकाळ्या शांत झाल्या असून, तिचा मृत्यूशी लढा अपयशी ठरला आहे. गुरुवारी तिला पेटवून दिल्यानंतर लखनौहून तिला एअर ऍम्ब्युलन्सने दिल्लीला उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, 90 टक्के ती भाजली असल्याने अखेर तिचा मृत्यू झाला आहे. उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात ती 90 टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री 11.40 च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. कार्डिऍक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. यापूर्वी तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even Lord Rama cant ensure a 100 percent crime free society, says UP Minister on Unnao rape case