UP Government Jobs: पोलीस, वन, कारागृह आणि परिवहन विभागांत माजी अग्निवीरांना संधी; वयोमर्यादेतही सवलत

Ex Agniveer Reservation, UP Government Jobs, Age Relaxation अंतर्गत उत्तर प्रदेश सरकारने पोलीस, वन, कारागृह आणि परिवहन विभागांतील थेट भरतीत माजी अग्निवीरांसाठी २० टक्के समांतर आरक्षण मंजूर केले आहे.
agneevir 20 percent reservation in government job

agneevir 20 percent reservation in government job

esakal

Updated on: 

लष्करात सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांना राज्य सरकारी सेवेत संधी उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने भरती नियमांत बदल करण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस, वन, कारागृह आणि परिवहन विभागातील थेट भरतीत माजी अग्निवीरांसाठी २० टक्के समांतर आरक्षण मंजूर करण्यात आले. या भरतीसाठी लेखी आणि शारीरिक चाचणीतून सूट देण्यासह कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सवलत देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com