उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राम नरेश यादव यांचे निधन

यूएनआय
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

लखनौ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व मध्य प्रदेशचे माजी राज्यपाल राम नरेश यादव (वय 90) यांचे दीर्घ आजारामुळे येथील "एसजीपीजीआय' रुग्णालयात मंगळवारी निधन झाले.

लखनौ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व मध्य प्रदेशचे माजी राज्यपाल राम नरेश यादव (वय 90) यांचे दीर्घ आजारामुळे येथील "एसजीपीजीआय' रुग्णालयात मंगळवारी निधन झाले.

यादव यांनी 1977मध्ये आझमगढमधून लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव व राज्यपाल राम नाईक, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह, कॉंग्रेसचे उत्तर प्रदेश अध्यक्ष राज बब्बर व अन्य मंत्र्यांनी यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 1977 ते 1979 या काळात जनता पक्ष उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर होता. त्या वेळी यादव मुख्यमंत्री होते. 2011 मध्ये मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाली होती. 2004 ची लोकसभा निवडणूक त्यांनी कॉंग्रेसकडून लढविली होती; पण बहुजन समाज पक्षाचे रमाकांत यादव यांनी त्यांचा पराभव केला होता.

मध्य प्रदेशमधील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापम) कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारात यादव यांचे नाव घेतले जात होते. नंतर तेथील उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधातील "एफआयआर' रद्द केली होती. त्यांचे चिरंजीव शैलेश यांचेही नाव "व्यापम'च्या आरोपींमध्ये होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांचा गूढ पद्धतीने मृत्यू झाला.

Web Title: ex. chief minister ram naresh yadav death