चंद्रशेखर यांच्यावरील पुस्तकाचे मोदींच्या हस्ते होणार प्रकाशन 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 July 2019

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जीवनावरील "चंद्रशेखर- वैचारिकतेच्या राजकारणाचा अखेरचा आदर्श' या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (ता.24) सायंकाळी संसदेत होणार आहे. 

नवी दिल्ली ः माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जीवनावरील "चंद्रशेखर- वैचारिकतेच्या राजकारणाचा अखेरचा आदर्श' या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (ता.24) सायंकाळी संसदेत होणार आहे. 

तत्वनिष्ठ राजकारण करणाऱ्या फळीतील अखेरचा शिलेदार असे वर्णन होणारे चंद्रशेखर यांचा सहवास लाभलेले राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश यांनी हे पुस्तक लिहीले आहे.

पुस्तक प्रकाशनावेळी उपराष्ट्रपती व राज्यसभाध्यक्ष एम वेंकय्या नायडू, लोकसभा सभापती ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, सपा नेते रामगोपाल यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हरिवंश यांना संपादकपदाच्या काळात चंद्रशेखर यांचा दीर्घकाळ सहवास लाभला. त्यातूनच हरिवंश यांनी पत्रकारितेतून सक्रिय राजकारणात येण्याचे ठरविले असे सांगितले जाते. चंद्रशेखर हे हरिवंश यांचे आदर्श आहेत. त्यांच्यावर त्यांनी पुस्तक लिहीले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex pm Chandrasekhar book inauguration by pm modi