
६० मुलींचं लैंगिक शोषण; शिक्षकाच्या निवृत्तीनंतर धक्कादायक प्रकार उघड
केरळमध्ये एका शिक्षकाने तीस वर्षांत ६० विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
केव्ही शशिकुमार हे सेंट जेम्मास या मुलींच्या शाळेत शिकवत होता. त्यावेळी त्याने अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले. अशा ५० हून अधिक विद्यार्थिनींनी या शिक्षकाविरोधात तक्रार दिली आहे. हा शिक्षक मलप्पुरम नगरपरिषदेचा सदस्यही आहे. या शाळेतून निवृत्त झाल्यानंतर तो नगरसेवक झाला होता. आपल्या निवृत्तीची पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यानंतर त्याच्यावर #MeToo अंतर्गत एका माजी विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.
अनेक विद्यार्थिंनीनी तक्रार दाखल केल्यानंतर शशिकुमारने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. माजी विद्यार्थी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थिनींनी २०१९ मध्येच तक्रार दिली होती. पण शाळा प्रशासनाने या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर माजी विद्यार्थी संघटनेने मलप्पुरम जिल्हा पोलीसांकडे धाव घेतली. या प्रकारानंतर या नगरसेवकाला पक्षातूनही काढून टाकण्यात आलं आहे.
Web Title: Ex Teacher Held In Kerala For Molesting Over 60 Students In 30 Years
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..