दिल्लीकरांमध्ये समूह रोगप्रतिकारशक्ती विकसित ? 

corona
corona
Updated on

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील कोरोनाच्या सक्रिय रूग्णसंख्येत रोज होणारी घसरण चालूच असून दिल्लीकरांमध्ये समूह रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित झाल्याचे हे चिन्ह असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. एखाद्या शहरात हर्ड इम्युनिटी विकसित होण्यासाठी किती टक्के लोकांनी किंवा तेथील एकूण लोकसंख्येच्या किती प्रमाणात नागरिकांनी कोरोनाला हरवावे लागते याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे निश्‍चित नियम आहेत काय, याबाबत चर्चा सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हर्ड इम्युनिटी ही कोरोना संसर्गाच्या काळात वापरली जाणारी एक नोंदप्रक्रिया आहे. एकूण लोकसंख्येच्या ७५ टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता तेवढ्याच सक्रियपणे विकसित झाली व टिकली तर त्या अवस्थेला त्या शहरवासीयांची ‘हर्ड इम्युनिटी’ म्हटले जाते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोविड-१९ बाबत याचे प्रमाण ६० टक्के लोकसंख्येतील रोगप्रतिकरारशक्तीची वाढ इतके असले पाहिजे. एखाद्या शहरात-महानगरात सलग १४ दिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने घसरण होत राहिली तर कोरोनाच्या सर्वाधिक रूग्णवाढीचा भीषण संक्रमणकाळ संपल्याचे ते एक ठळक निर्देशक मानले जाते. न्यूयॉर्कमध्ये मे महिन्यामधील कोरोना कहर झाल्यानंतरच्या काळात रूग्णांच्या संख्येत जसा घसरता आलेख दिसला होता तशीच परिस्थिती दिल्लीत सध्या आहे. मात्र यावरून कोरोना संसर्ग संपला असे अजिबात मानता येणार नाही, असे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अर्थचक्र फिरणार 
दिल्लीत रुग्णसंख्या कमी होण्याचे प्रमाण पुढे आठवडाभर कायम राहिले तर कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अनलॉक-३ मध्ये दिल्लीतील ११ जिल्ह्यांत आणखी काही व्यवहारांना परवानगी मिळेल अशी दाट शक्‍यता आहे. अर्थात, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम कायम राहतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com