

astro tourism observator in uttarakhand pithoragarh
esakal
उत्तराखंडमधील निसर्गरम्य पिठोरगड जिल्हा, जो आपल्या सौंदर्यामुळे 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखला जातो, आता खगोलशास्त्र प्रेमींसाठी एक नवे केंद्र बनला आहे. जिल्हा पर्यटन विभागाने 'स्टारस्केप्स एक्सपिरियन्स'च्या सहकार्याने येथे पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा (Astronomy Observatory) सुरू केली आहे. शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने घेतलेला हा निर्णय पर्यटकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे.