Explosion In Gujarat : गुजरातमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट १८ जण ठार
Industrial Accident : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील दीसा गावातील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच जण गंभीर जखमी असून, मदतकार्य सुरू आहे.
पालनपूर : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा गावातील औद्योगिक वसाहतीमधील फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी झालेल्या स्फोटात किमान १३ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.