स्फोटकं वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट; कमीतकमी 8 मजुरांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 22 January 2021

कर्नाटकच्या शिवगोमा जिल्ह्यात गुरुवारी रात्री स्फोटके वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट झाला आहे.

बेंगळुरु- कर्नाटकच्या शिवगोमा जिल्ह्यात गुरुवारी रात्री स्फोटके वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट झाला आहे. यात कमीतकमी 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्फोट इतका मोठा होता की आजपासच्या परिसरात हादरे अनुभवायला मिळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटके खाणकामाच्या उद्धेशासाठी वापरले जाणार होते. 

खाणकामाच्या ठिकाणी स्फोटकं घेऊन जात असताना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारात हा स्फोट झाला. स्फोटाचे हादरे केवळ शिवमोगाच नाही तर चिक्कमंगळुर आणि दावणगेरे जिल्ह्यामध्येही ऐकायला मिळाले. स्फोट इतका भीषण होता की यामुळे घराच्या खिडकीच्या काचा तुटल्या आणि रस्त्यावरही भेगा पडल्या. स्पोटामुळे अनेकांना भूकंप झाल्याची शंका आली. अनेकांनी भूगर्भ वैज्ञानिकांशी संपर्क साधला. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: explosion in stone quarry in shivamogga district of karnataka

Tags
टॉपिकस
Topic Tags: