ISIS दहशतवाद्याच्या घरी सापडली स्फोटके आणि आत्मघातकी जॅकेट; मोठ्या हल्ल्याची होती योजना

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 23 August 2020

उत्तर प्रदेशच्या बलरामपुरमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

लखनौ- उत्तर प्रदेशच्या बलरामपुरमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये एक्सप्लोजिव जॅकेट सुद्धा आहेत, याद्वारे मोठा हल्ला करण्याची आंतकवाद्याची योजना असल्याचं स्पष्ट होत आहे. दिल्लीच्या धौला कुआमधून ताब्यात घेण्यात आलेला आयएसआयएसचा (ISIS) दहशतवादी अबू युसूफ बलरामपुरचाच रहिवासी आहे. आत्मघातकी हल्ल्यासाठी जॅकेट बेल्ट तयार केल्याची कबुली दहशतवाद्याने दिली होती. पोलिस आणि एटीएस त्याच्या ठिकाणांवर छापेमारी करत आहे.

देशात पाच राज्यांत कोरोनाचा उद्रेक; दिल्लीतच सापडतातय जास्त रुग्ण, काय आहे कारण?
 

दिल्लीत अटक करण्यात आलेला दहशतवादी अबू युसूफ याने धक्कादायक खुलासे केले आहेत. दहशतवाद्याचा आत्मघातकी हल्ला करण्याचा प्रयत्न होता. युसूफने केलेल्या दाव्याचे पुरावेही सापडले आहेत. त्याने जॅकेट बनवल्याचं सांगितलं होतं. युसूफला दिल्लीच्या धौला कुआ येथून शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आले होते. अबू युसूफ उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला तालुक्यातील बढ्या भैसाही गावचा राहणारा आहे. त्याच्या परिवारात पत्नी आणि चार मुले आहेत. गावात त्याची एक कॉस्मेटिकची दुकान आहे.

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 30 लाखांच्या वर; संसर्गाचा वेग वाढला
 

आत्मघातकी हल्ल्यासाठी जॅकेट केलं तयार

पोलिसांनी केलेल्या चौकशीत अबू युसूफने कबुल केलं आहे की, त्याने आत्मघातकी हल्ल्यासाठी शरिरावर स्फोटके बांधणारे जॅकेट तयार केलं आहे. दिल्ली पोलिसच्या स्पेशल सेलचे डीएसपी यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. अबू युसूफ दिल्लीमधील गर्दीच्या ठिकाणी मोठा स्फोट करु पाहात होता. युसूफ सोशल मीडियाद्वारे आयएसआयएसशी संपर्कात आला होता. २०१० मध्ये तो कामासाठी सौदी अरेबियाला जाऊन आला आहे. तेव्हा पासून त्याच्या डोक्यात हल्ल्याची योजना सुरु होती, अशी माहिती डीएसपीने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षाच्या या दहशतवाद्याजवळ दोन आईईडी बेस्ड प्रेशर कुकर बॉम्ब, एक सॉफिस्टिकेटेड पिस्तुल, चार कार्टेज आणि एक मोटारसायकल मिळाली आहे. मोटारसायकल चोरीची असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डीएसपीने सांगितलं की, अबू युसूफने स्वत: आईईडी बनवण्याची कला अवगत केली होती. त्याने डिसेंबरमध्ये आईईडी बनवले होते. शिवाय गावातील दफमभूमी जवळ छोट्या स्तरावर याची चाचणीही घेतली होती.  त्याच्या जवळ असणारी आईईडी त्याने बनवली की दुसऱ्याकडून बनवून घेतली याची माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, सध्या मुंबई गणेशोत्सोव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरु केली आहे.

(edited by-kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Explosives and suicide jackets found at ISIS terrorist home