मनोज तिवारी यांची पक्षातून हकालपट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 3 June 2020

तिवारी चुकलेच

  • दिल्ली भाजपच्या नेत्यांशी कधीही पटले नाही. 
  • राजकीय स्टंट व विनाकारण वाद वाढविण्याची सवय.
  • दिल्लीच्या निवडणुकीआधी अरविंद केजरीवाल यांच्या हनुमानाचे दर्शनावर तिवारी यांनी खिल्ली उडवल्याने मोठा वर्ग दुखावला गेला.
  • मदनलाल खुराना, केदारनाथ सहानी, हर्षवर्धन आदी माजी अध्यक्षांचा वसा व वारसा सांभाळता आला नाही.
  • लॉकडाउनमध्ये क्रिकेट खेळणे, ‘आप’ विरुद्ध आंदोलन करणे 

नवी दिल्ली - राजकीयदृष्ट्या देशाचे नाक समजल्या जाणाऱ्या राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांची हकालपट्टी करून आदेशकुमार गुप्ता या नव्या चेहऱ्याच्या हाती दिल्लीचे प्रदेशाध्यक्षपद सोपविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्तीसगड व मणीपूर येथील प्रदेशाध्यक्षपदीही नव्या नियुक्त्या केल्या. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यकाळात त्यांच्याच हातून दिल्लीतील हा खांदेपालट भाजप नेतृत्वाने तडीस नेला आहे. 

अर्थव्यवस्था स्वत:ला सावरेल; मोदींचा विश्‍वास 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expulsion of Manoj Tiwari from the party